नवी मुंबईतील तुर्भे मधील शिव छाया मित्र मंडळाचा गणपती नवी मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेश मंडळ,असून या ठिकाणी प्रत्येक वर्षी नव नवीन देखावे उभारले जातात, या वर्षी मंडळाने छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा देखावा साकारला आहे. नवी मुंबईसह रायगड,ठाणे,मुंबई मधून लाखो गणेश भक्त देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात.रोज हजारो गणेश भक्त या ठिकाणी गर्दी करतात.
मंडळाचे या वर्षीचे 54 वर्ष असून,दहा फुटांच्या बाप्पाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी आणि आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी गणेश भक्त अतुर होताना दिसत आहे. आकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात मंडळ अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवतो. यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार यांचा सत्कार तर महिला सक्षमकरणासाठी काही कार्यक्रम घेतले जातात, मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती, यांनी शिव छाया मंडळ अत्यंत जुने आणि नवी मुंबईतील पहिले सार्वजनिक मंडळ असून, मंडळ दान पेटीत आलेले पैसे कुणाला मदत तर समाजोपयोगी कार्यक्रमासाठी वापरले जातात.
आकरा दिवस अनेक कार्यक्रम आणि करमणुकीचे कार्यक्रम घेतले जातात,तर बाहेर मेळा भरवला जातो.तर दर्शनासाठी आलेल्या. भक्तांना काही त्रास झाल्यास प्रथमोपचार करून सोडले जाते. नवी मुंबई सह इतर ठिकाणाहून लाखो भक्त देखावा पाहण्यासाठी येतात तर बाप्पाचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त करतात.